वृत्तसंस्था/ अॅस्ताना
भारताच्या सिद्धांत बंटिया आणि साई कार्तिक रे•ाr यांनी रविवारी येथे झालेल्या 25 हजार डॉलर्स एकूण बक्षिस रकमेच्या टेनिस स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात सिद्धांत आणि साई रे•ाr यांनी इस्टोनियाच्या डॅनिल ग्लिनेका आणि सार यांचा 7-5, 6-7 (13-15), 10-4 असा पराभव केला. गेल्या जून महिन्यात झालेल्या जकार्तामधील स्पर्धेत सिद्धांतने विजेतेपद पटकाविले होते.
पोतुर्गालमधील पोर्टो येथे झालेल्या 145,000 युरोस एकूण बक्षिस रकमेच्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या अर्जुन कढे आणि ऋतविक चौधरी यांना दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जपानच्या मात्सूई आणि युसूगी यांनी अर्जुन आणि ऋतविक यांचा 6-7 (5-7), 6-3, 10-5 असा पराभव केला. गेल्या महिन्यात जर्मनीत झालेल्या चॅलेंजर टेनिस स्पर्धेत अर्जुन आणि ऋतविक यांनी दुहेरीची अंतिमफेरी गाठली होती.









