श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेचा सात दिवसांचा असणार उत्सव
निमसोड (ता. खटाव) येथिल ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त रविवार दि. २ पासून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. २ रोजी दुपारी एक वाजता गजीनृत्य महोत्सव झाला. रात्री देवाची पालखी मिरवणूक (छबिना) काढण्यात आला.
सोमवार दि. ३ रोजी दिवसभर देवाचा रथोत्सव होणार आहे. रात्री कोल्हापूर येथील वैभव ऑर्केस्ट्राचा करमणूक कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. ४ रोजी सकाळी कमल कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. दुपारी कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. रात्री मंगला बनसोडे कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे.
बुधवार दि. ६ रोजी सिद्धनाथ केसरी बैलगाडी शर्यत होणार आहे. यातील फायनल फेरीतील विजेत्यांना अनुक्रमे १ लाख ११ हजार, ९१ हजार १११, ७१ हजार १११, ५१ हजार १११, ३१ हजार १११,२१ हजार १११,११ हजार १११ रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. रात्री कोल्हापूर येथील जल्लोष ऑर्केस्ट्राचा करमणूक कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दि. ७ रोजी रात्री पुजारी डेकोरेशनच्या वतीने मोफत मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहे.








