बेंगलूर : केंद्राने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (पीएफआय) बंदी घातल्यानंतर विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी घालण्याची मागणी करताच, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सिद्धरामय्या यांच्यावर टीका केली. “आरएसएसवर बंदीची मागणी करणे हे खरोखरच दुर्दैवी आहे. सिद्धरामय्या यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नये.” असे त्यांनी आपले मत व्यक्त केले.
केंद्र सरकारने पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित आठ संघटनांवर दहशतवादी निधीशी संबंध असल्यावरून बंदी घातल्याने, सिद्धरामय्या यांनी आरएसएसवर ही अशीच कारवाई करण्याची मागणी केली. सिद्धरामय्या यांना असा आरोप केला कि राष्ट्रिय स्वयंसेवक संघ समाजातील शांतता बिघडवत आहेत.
यावर बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, की “सिद्धरामय्या यांच्याकडे पीएफआय बंदीवर प्रश्न विचारण्याशिवाय काही नाही. त्यांनी मुख्यमंत्री असताना पीएफआयवरील खटले मागे घेतले होते. आता ते लपवण्यासाठी ते आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. पण आरएसएसवर बंदी का घालावी हे त्यांना सांगता येत नाही.” ते पुढे म्हणाले की, “राष्ट्रिय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी करणे खरोखरच दुर्दैवी आहे, सिद्धरामय्या यांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नये.” असा सल्ला दिला
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









