बेळगाव – विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी आज अधिवेशनात पराभूत उमेदवारांच्या नावावर विकासकामांसाठी निधी मंजूर करण्याच्या धोरणाविरोधात नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले की, पराभूत उमेदवाराच्या नावाने अनुदान मंजूर करणे योग्य नाही. पराभूत उमेदवाराला जनतेसोबत काम करायला लावणे लोकशाहीच्या विरोधात आहे. पुढच्या वेळी जेव्हा तो जिंकून येईल तेव्हा ते काम करू द्या. ही वाईट संस्कृती इथेच थांबली पाहिजे. असे सांगितले. यावर सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी म्हणाले की, ते जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा ही असेच झाले.
यावर सिद्धरामय्या म्हणाले जर असे झाले असेल तर ते त्याला ही विरोध आहे . पराभूत उमेदवाराच्या नावावर विकासकामे मंजूर झाली, तर ते लोक मंजूर करू शकतील की त्याला चालना देऊ शकतील ? यादरम्यान ही प्रथा पुढे नेऊ नका आणि मंजूर झालेला निधी रद्द करा असा दबाव टाकला .
त्याचवेळी शृंगेरीच्या आमदाराने आपल्या भागातील विकासकामांसाठी आमदाराऐवजी 23 जणांना निधी मंजूर केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. तो आमदार नाही का? असा सवाल करत या अन्यायाविरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला. मंत्री माधुस्वामी म्हणाले विकासकामांचा आणि आमदाराचा पूर्वी कोणताही संबंध नव्हता. आमदारांनी आवश्यक निधी मंजूर करावा. ही प्रथा आम्ही सुरू केली आहे. विकासकामांसाठी कोणी स्वत: पुढे आले तर त्याला नाकारता येणार नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









