Karnataka Swearing-in Ceremony Updates : कर्नाटकातील नेृतत्वाचा तिढा पाच दिवसांनी सुटल्यावर आज सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री तर डी.के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा बेंगळुरूच्या कांतीराव स्टेडियमवर पार पाडला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली.सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीच्या निमित्ताने कर्नाटकच्या भूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी ऐक्याचे दर्शन घडवण्यात आले.
यावेळी जी परमेश्वर, एम. बी. पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियंक खर्गे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, अभिनेते कमल हसन, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आदी उपस्थित होते.
कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला. पण मुख्यमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा कळीचा मुद्दा होता. दरम्यान, काँग्रेसश्रेष्ठींनी सिध्दरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. तर डी.के शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांची नाराजी दूर केली.
Previous Articleफुटबॉलच्या राष्ट्रीय परीक्षेत कोल्हापूरी संघ पास
Next Article एकनाथ शिंदे भाजपलाही डोईजड ठरू शकतात









