कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी भाजप आणि कर्नाटकातील त्यांचा विरोधी जेडीएसवर खरपूस टीका केली आहे. या पक्षांना कोणतीही विचारधारा किंवा तर्कसंगतता नाही तसेच आपण कधीही भाजप किंवा त्यांची मूळ संघटना आरएसएसमध्ये जाणार नसून पुनरुच्चार केला.
कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील मगडी येथे एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले, “भाजपने माझ्यावर हिंदूविरोधी असल्याचा आरोप केला आहे. भाजपचे सी.टी. रवी हे मला सिद्धरामउल्ला खान म्हणत आहेत. पण गांधीजी खरे हिंदू होते. पण गांधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेंची ते पूजा करतात.” असे ते म्हणाले. भाजपसोबत सामील झालेल्या जेडीएसला प्रतिष्ठा आणि आदर आहे का, असा सवाल त्यांनी केला.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री राहीलेले सिद्धरामय्या म्हणाले की, “भाजपने मला अध्यक्ष आणि पंतप्रधान जरी केले तरी मी भाजप आणि आरएसएससोबत जाणार नाही. जिवंतपणीच काय मी मेल्यानंतरही माझे प्रेत भाजप आणि आरएसएससोबत जाणार नाही.” असा त्यांनी पुनर्उच्चार केला. सत्तेसाठी भुकेले असलेले जनता दल (धर्मनिरपेक्ष) किंवा त्यांच्यासारखे प्रादेशिक पक्ष भाजपसोबत जाणार असल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केला. जेडीएसकडे कोणतीही विचारधारा नाही आणि तर्कशुद्धता नाही सत्तेसाठी ते कुणासोबतही जातील. असे ते म्हणाले.
Previous Articleअल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षे कारावास
Next Article पोटनिवडणुकीसाठी कसबा मतदारसंघात प्रतिबंधात्मक आदेश









