Siddaramaiah :“आम्ही एक प्रशासन देऊ ज्याची लोकांना आमच्याकडून अपेक्षा होती.मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच आश्वासने मंजूर केली जातील आणि आजच त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले जातील,”अशी माहिती सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर दिली. पुढील पाच वर्षांत इतर आश्वासनांची अंमलबजावणी केली जाईल, असेही ते म्हणाले. भूतकाळात आम्ही वचन दिले होते ते पूर्ण केले आणि भविष्यातही आम्ही तेच करू असेही सिद्धरामय्या म्हणाले.
शपथ घेतल्यानंतर डी. के. शिवकुमार म्हणाले, आमच्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी नवीन प्रवास सुरू करत असताना, मी वचन देतो की काँग्रेस सरकार शाश्वत प्रगती आणि सर्वांच्या कल्याणाची हमी देईल. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी बंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर हजारो लोकांच्या साक्षीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी राहुल गांधी,प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते.
शपथविधीनंतर सिद्धरामय्या आणि शिवकुमार दोघेही मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेण्यासाठी विधानसौद्धाकडे निघाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली. त्यांनी ट्विट करत फोटो शेअर केला आहे.जी परमेश्वर आणि एमबी पाटील यांच्यासह आठ नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शुक्रवारी दिल्लीत सिद्धरामय्या, शिवकुमार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या आठही आमदारांची निवड करण्यात आली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









