ऑस्ट्रेलियातील लिलिपॅडची निर्मिती पूर्ण झाली आहे. लिलिपॅड सिडनी शहरात असून ते केवळ दोन लोकांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. म्हणजेच जोडप्यासाठी ही जागा उत्तम आहे. लिलिपॅड्स दोन मजली व्हिला असून याच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. कॅक्टस आणि फॅन्सी आउटडोअर शॉवरची सुविधाही यात देण्यात आली आहे. येथे एक रात्र वास्तव्य करण्यासाठी संबंधितांना 1950 डॉलर्स म्हणजेच 1 लाख 60 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.

सिडनीतील लिलिपॅड हा एक असा व्हिला आहे, जो ऑस्ट्रेलियाच्या पाम बीचनजीक डिझाइन करण्यात आला आहे. हे सिडनीत असून ते केवळ दोन जणांच्या वास्तव्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. डिझाइनर आणि इंजिनियर अँडरसन यांची ही कल्पना असून याची निर्मिती पाण्यावर करण्यात आली आहे. या लिलिपॅडला फ्लोटिंग हाउस म्हणजेच तरंगते घर देखील म्हटले जाते.
या तरंगत्या घरात राहण्यासाठी लोक उत्सुक असतात. लिलिपॅड्स दोन मजली व्हिला आहे. या घरात तुम्ही स्वतःचे साहित्य घेऊन जात स्वयंपाक करू शकता. तसेच पूर्वीच बुक करण्यात आलेल्या स्थानिक रेस्टॉरंटमधून ऑर्डर करण्याची सुविधा येथे प्राप्त आहे. या कॉटेजचे इंटीरियर अत्यंत सुंदर आहे. उन्हाळय़ात येथील पाण्याचे तापमान 21 अंश सेल्सिअस तर हिवाळय़ात 17 अंश सेल्सिअसदरम्यान असते. हे तापमान वास्तव्यासाठी अत्यंत उत्तम मानले जाते.









