बेळगाव : बेळगाव येथील के एल एस गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सची विद्यार्थिनी कु. श्वेता शंकर ताशीलदार हिने राणी चन्नमा विद्यापीठाच्या 2022-23 या शैक्षणिक वर्षातील बी कॉम अंतिम परीक्षेत 95.03% गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिने ओडिटिंग आणि इन्कम टॅक्स या विषयात 100 पैकी 100 गुण तर ERP या विषयात 50 पैकी 50 गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिला कॉलेजचे प्राचार्य एच एच बिरापूर तसेच आदींचे मार्गदर्शन लाभले असून ती श्री मराठा पंच कमिटी, सराफ गल्ली, शहापुर येथील शंकर परशराम ताशीलदार यांची कन्या आहे.
Previous Articleतालुका, जिल्हा न्यायालयांना मूलभूत सुविधा द्या
Next Article होनगा औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना 31 दिवसांत खाता