Shweta Madurkar 1st in Aros High School Elocution Competition
विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व व वेशभूषा स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद लाभला आरोस व परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आरोस येथील परिवर्तन युवक मंडळाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली होती. पहिली ते चौथी- दुसरा गट ,पाचवी ते सातवी व तिसरा गट आठवी ते दहावी अशा तीन गटात ही स्पर्धा झाली . स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे वेशभूषा पहिली ते चौथी गट प्रथम सांगवी रुपेश मोरजकर द्वितीय वीरा समीर परब तृतीय वैदेही हेमंत कामत पाचवी ते सातवी गट प्रथम पूर्वा रघुनाथ परब द्वितीय तनवी प्रमुख परब तृतीय आर्या नितेश नाईक आठवी ते दहावी गट प्रथम दत्ताराम सुभाष मुरजकर द्वितीय श्वेता सुरेश मधुरकर वक्तृत्व स्पर्धा पहिली ते चौथी प्रथम वीरा समीर परब द्वितीय प्रणय उमेश गवस तृतीय पूर्वी महेश्वर कळंगुटकर पाचवी ते सातवीच्या गट प्रथम तनुष्का हरिदास मिस्त्री द्वितीय अस्मी संतोष पिंगुळकर तृतीयनिधी गणेश प्रसाद भट आठवी ते दहावी गट प्रथम श्वेता सुरेश मधुरकर द्वितीय जानवी शैलेश शिरोडकर यावेळी आर पी डी हायस्कूल सावंतवाडीच्या कुमारी अस्मी प्रवीण मांजरेकर हिने शिवाजी महाराजांवर केलेल्या भाषणाने सर्वांची मने जिंकून घेतली स्पर्धेचे परीक्षण सावंतवाडी येथील कवी दीपक पटेकर आरपीडी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मिलिंद कासार यांनी केलं स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे पुरस्कर्ते व आरोस परिवर्तन युवक मंडळाचे अध्यक्ष निखिल नाईक सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर परीक्षा पटेकर प्राध्यापक कासार मुख्याध्यापक सदाशिव धुपकर सुषमा मांजरेकर रूपा कामत निलेश देऊळकर अनुष्का गावडे मोहन पालेकर व अन्य शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे देऊळकर यांनी तर आभार सौ मांजरेकर यांनी मानले.
न्हावेली वार्ताहर









