सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रथम क्रमांक
ओटवणे प्रतिनिधी
देवसू माध्यमिक विद्यालयातील कु श्वेता रामकृष्ण देऊसकर या विद्यार्थिनीने महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा महामंडळाची “नॅशनल मेन्स मेरिट स्कॉलरशिप” पटकावताना जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. सध्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसह पालकांचा प्राथमिकसह माध्यमिक शिक्षणासाठी शहराकडे कल असतो. मात्र देवसु ओवळीये पारपोली सारख्या ग्रामीण भागातील या माध्यमिक विद्यालयातील शेतकरी कुटुंबातील कु श्वेता देऊसकर या विद्यार्थिनीने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. त्यामुळे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना भौतिक सुविधांपेक्षा उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधा व शिक्षकांचे मार्गदर्शन कशाप्रकारे मिळते यावरच विद्यार्थी भविष्यात आपल्या जीवनात विविध क्षेत्रात यश मिळवत असतात. याच दृष्टीने याप्रशालेने अनेक विद्यार्थी घडविले आहेत. त्यामुळेच देवसु माध्यमिक विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी केली असून आपल्या पुढील जीवनात विविध क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत.या यशाबद्दल कु श्वेता देऊसकर हिचे गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. लवू सावंत, उपाध्यक्ष प्रमोद परब, सचिव मोहन गवस संचालक सागर सावंत, विठ्ठल सावंत, अविनाश सावंत, राजेश परब, अरुण परब यांच्यासह पारपोली ओवळीये व देवसु गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले. कु श्वेता देऊसकर हिला देवसू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम पाटील, शिक्षिका सोनाली परब, मिना डोंगरे, सिद्धराम राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.









