वृत्तसंस्था/ चेन्नई
गुजरात टायटन्स कर्णधार शुभमन गिल याला चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती न राखल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, षटकांची गती न राखण्याचा गुजरात टायटन्सकडून पहिल्यांदाच गुन्हा झाला असल्याने कर्णधार गिलला 12 लाखाचा दंड करण्यात आला आहे, असे आयपीएलने निवेदनाद्वारे सांगितले. मंगळवारी झालेल्या सामन्यात गुजरातला या मोसमातील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएलमध्ये प्रथमच नेतृत्व सांभाळणाऱ्या गिलच्या गुजरात संघाने त्याआधी पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर 6 धावांनी निसटता विजय मिळविला होता.









