Shubhra Satji became the champion of Paithani
श्री देव ब्राम्हण नवरात्रौत्सव मंडळ रेडी म्हारतळेवाडी आयोजित खेळ पैठणीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक शुभ्रा शंभा सातजी, व्दितीय क्रमांक मृणाल मोहन गवंडी, तृतीय क्रमांक शतायु मनमोहन महाले यांनी पटकाविला.
अन्य घेतलेल्या पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक अश्वीनी अर्जून मांजरेकर ,द्वितीय क्रमांंक रिया गजानन बांदेकर, तृतीय क्रमांक शतायु मनमोहन महाले यानी पटकाविला.
रेडी मर्यादित पुरूषांच्या ६००किलो वजन गटाच्या रस्सीखेच स्पर्धेत झिंगारो बॉयज गावतळे याने प्रथम व सुर्या इलेव्हन म्हारतळे याने व्दितीय क्रमांक मिळविला. प्रथम क्रमांकास रूपये १००१, व्दितीय क्रमांकास ५०१ रुपये बक्षीस देण्यात आले ही बक्षीसे ग्रा. पं. सदस्य श्रीकांत राऊळ याने पुरस्कृत केली होती.पैठणीच्या खेळासाठी कै.सुर्यकांत म्हापणकर यांच्या स्मरणार्थ सुनिता सुधिर पाटील व पाककला स्पर्धेसाठी आजगांवकर कुटुंबीय यांनी बक्षिसे दिली.
रेडी / प्रतिनिधी









