जाफरवाडी गाव मर्यादित मिनी मॅरेथॉन स्पर्धा
बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी
जाफरवाडी येथे जी. एस. फौंडेशनवतीने गाव मर्यादित 10 कि. मी. मिनी मॅरेथॉन स्पर्धेत शुभम पाटील याने प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एम. एस. पाटील, जी. एस. तरळे, पी. के. पाटील, शिवाजी कटांबळे, जयवंत कटांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. ही स्पर्धा जाफरवाडी येथून सुरुवात होऊन कडोली वेशीपर्यंत व परत त्याच मार्गे जाफरवाडी येथे समाप्त झाली. स्पर्धेत शुभम पाटील प्रथम आला. त्याला सायकलचे बक्षीस, परशराम गौंडवाडकर दुसरा आला. त्याला फॅनचे बक्षीस, सुमित गौंडवाडकर तिसरा आला. त्याला इस्त्रीचे बक्षीस, दक्ष पाटील चौथा तर विश्वास डोंगरेने पाचवा क्रमांक पटकाविला. चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी रोख रक्कमेचे बक्षीस होते. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून एन. आर. पाटील, बसवंत डोंगरे, उमेश बेळगुंदकर, जोतिबा मुतगेकर, टी. एस. पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती पाटील यांनी तर आभार पी. आर. पाटील यांनी मांडले. तत









