वृत्तसंस्था/ अल एन ( यूएई)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे झालेल्या अल एन मास्टर्स 100 सुपर बॅडमिंटन स्पर्धेत भारताची महिला बॅडमिंटनपटू श्रीयांशी वालीशेट्टीने एकेरीचे जेतेपद पटकाविले.
120,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तेलंगणाच्या 18 वर्षीय वालीशेट्टीने आपल्याच देशाच्या तस्निम मिरचा 15-21, 22-20, 21-7 अशा गेम्समध्ये पराभव केला. हा अंतिम सामना 49 मिनिटे चालला होता. वालीशेट्टी ही पी. गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये सराव करीत आहेत.









