नवी दिल्ली
इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी) आणि श्रीराम हाऊसिंग यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणपुरक हरित बांधकाम प्रकल्पांसाठी दोन्ही कंपन्या भागीदारी करणार आहेत. भारतात पर्यावरणपुरक हरित घरे बांधण्यासाठी ही भागीदारी असून घरांची उभारणी अशी करण्यात येणार आहे जेणेकरुन 20 टक्के इतकी बचत वीजबिलात होऊ शकणार आहे. उत्तम रचना व उत्तम राहणीमानाचा अनुभव नव्या हरित प्रकल्पातून ग्राहकांना घेता येणार आहे.









