सुधाकर काशीद,कोल्हापूर
Shrimant Shahu Maharaj Birthday : कोल्हापूरचा नवीन राजवाडा म्हणजे कोल्हापूरच्या वास्तुवैभवाचे एक सर्वोत्तम प्रतीक आहे. 1877 ते 1884 या कालावधीत बांधलेला हा राजवाडा आता जरूर पर्यटकांचे आकर्षण आहे. पण हा वाडा म्हणजे व्हिक्टोरियन गॉथिक शैलीच्या बांधकामाचा नमुना आहे. मेजर मॉंट या ब्रिटिश अभियंत्यांचा हा आराखडा असला तरीही कोल्हापूर संस्थानचे वैभव प्रकट करणारा हा वाडा आहे. केवळ एका ऐश्वर्याचा वाडा म्हणून नव्हे तर, या वाड्यातून सामाजिक हिताच्या दृष्टीने लाख मोलाचे आदेश निघाले.
शाहू महाराज,राजाराम महाराज,शहाजी महाराज,आत्ताचे शाहू महाराज युवराज संभाजी राजे,युवराज मालोजीराजे यांनी राजवाड्याचे वेगळेपण आपल्या कृतीतून जपले.या वाड्याला घड्याळाचा मनोर आहे. कायम फडकणारा भगवा ध्वज आहे.वाड्याच्या दरवाजांच्या काचावर इटालियन स्टाईलने शिवचरित्रातले प्रसंग कोरले आहे .दरबार हॉल आहे.तर मजल्यावर संस्थानकालीन वस्तू,कागदपत्रे,छायाचित्रांचा प्रदर्शन हॉल आहे. कायम देशभरातून आलेल्या पर्यटकांच्या गलबलाटाने वाड्याचा परिसर भरून जात आहे.
या वाड्याच्या रचनेने अनेक छायाचित्रकारांना आपल्याकडे खेचून घेतले.त्यामुळे वाड्याची वेगवेगळ्या अंगाने असंख्य छायाचित्रे निघाली. मोबाईल मधील कॅमेऱ्यामुळे तर नवा राजवाडा प्रत्येकाच्या मोबाईल मधला हक्काचा झाला.
अर्थात अशा नवीन राजवाड्याचे नवीन पिढीतील आर्किटेक्चर,चित्रकारांना आकर्षण वाटले नाही तर ते नवलच.त्यामुळे इथल्या दहा आर्किटेक्ट व चित्रकारांनी हा नवीन राजवाडा रंगरेषांच्या माध्यमातून टिपायचे ठरवले.गेल्या आठवड्यात ते राजवाड्याच्या वेगवेगळय़ा बाजूने त्याचा वेध घेत बसले.व त्यांनी राजवाड्याचे आपल्या रंगरेषातून अनोखे असे दर्शन घडवले.छायाचित्र काढताना एकच फोटो दहा वेळा घेता येतो.पण रेखाटन करताना खाडाखोड हा प्रकार अजिबात नसतो.त्यामुळे प्रत्येक नव्या रेषेत नवीन राजवाड्याचा एकेक पैलू चित्रबद्ध होत गेला.व त्याचा अनोखा नजराना श्रीमंत शाहू महाराजांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने साकारला.
राजवाड्याच्या रेखाटनात आर्किटेक्ट मिलिंद रणदिवे,शरद चंद्र मोघे ,अमर भोसले पूजा कांबळी,अशर फिलीप,ऋतुराज तांबेकर,निनाद कुलकर्णी,शुभम डोटमल,इंद्रजीत जाधव व सुयश गोडबोले हे सहभागी झाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








