श्रीलंकेत अध्यक्ष गोताभाया राजपक्षे यांनी राजीनामा दिला होता. तो स्वीकारण्यात आला आहे. तसेच संसद अधिवेशन उद्या भरवण्यात येईल असे संसद अध्यक्ष महिंद यापा अभयवर्धने यांनी सांगितले.
दरम्यान, संविधानानुसार नवीन अध्यक्षांची निवड येत्या आठवडाभरात होणं अपेक्षित आहे. तोपर्यंत प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून काम पाहतील. असेही स्पष्ट करण्यात आले आहे.