ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
श्रीलंकेवर आलेल्या आर्थिक संकटामुळे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. देशात आलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटानंतरही राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी अशा तणावपूर्ण वातावरणात 17 मंत्र्यांच्या नवीन मंत्रिमंडळाची नियुक्ती केली आहे. वाढत्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
“नवीन मंत्रिमंडळ आज शपथ घेणार असून राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे कायम राहतील. तसेच काही नवीन आणि तरुण चेहरे कॅबिनेट मंत्री म्हणून घेतले जाणार आहेत,” असे सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराने माध्यमांना सांगितले. श्रीलंकेतील विरोधी पक्षाने अनुभव नसलेल्या नव्या मंत्र्यांसह संपुर्ण मंत्रिमंडळ नियुक्त करण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयाला विरोध केला आहे.