प्रतिनिधी /पर्वरी
गोमंतक विद्या भारती कार्यकारिणी व गोमंतक दौऱयावर आलेले मा. श्रीरामजी आरावकर – राष्ट्रीय सहसंगठन मंत्री- विद्या भारती अखिल भारतीय शिक्षण संस्था यांनी मुख्यमंत्र्याची सदिच्छा भेट घेतली. यावेळी गोमंतक विद्या भारतीचे पदाधिकारी प्रसाद रांगणेकर, आशुतोष रावळ, रुपेश सावंत उपस्थित होते.
गोमंतक विद्या भारतीच्या समस्त उपक्रमांचा आढावा तसेच आगामी काळात योजीलेल्या समग्र कार्यक्रमांची तपशीलवार माहिती गोमंतक विद्या भारतीच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी गोमंतक विद्या भारती या संस्थेच्या कार्याची सखोल चौकशी केली आणि येत्या आगामी शैक्षणिक वर्षांमधे गोमंतक विद्या भारतीने संपूर्ण गोमंतकातील शैक्षणिक कार्यात तनमनधन झोकून देवून कार्याचा विस्तार करावा ही इच्छा व्यक्त केली. नविन शैक्षणिक धोरण गोव्यात राबविण्यास गोमंतक विद्या भारती बहुमोल योगदान करेल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यानी व्यक्त केली.









