वार्ताहर/सांबरा
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य युवा पिढीला सतत प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांनी हिंदू संस्कृती व मराठी भाषेचा विकास केला व सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आज हिंदू धर्म टिकून आहे, असे गौरवोद्गार श्रीराम सेना हिंदुस्थानचे तालुकाप्रमुख भरत पाटील यांनी काढले. निलजी येथे श्रीराम सेना हिंदुस्थान शाखेच्या वतीने मंगळवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी भरत पाटील यांनी शिवमुर्तीचे पूजन केले. तर संदीप मोदगेकर यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. याप्रसंगी बसवंत पाटील, पिंटू हिराप्पाचे, कपिल हिराप्पाचे, रवी गाडेकर, बाबाजी सुतार, शिवराज पाटील, प्रशांत मोदगेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.









