वार्ताहर/सांबरा
निपाणीहून गोव्याला वाहनातून बेकायदेशीररित्या घेऊन जाणाऱ्या गोवंशाची श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी सुटका केली. एम एच 04 जी सि 5597 या क्रमांकाचे वाहन निपाणीहून गोव्याच्या दिशेने निघाले होते. सकाळी साडे अकराच्या सुमारास कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते दिलीप कोंडुस्कोप, सचिन कदम, परशराम कल्लाण्णाचे व राहुल हणबर याना वाहनामध्ये गायी असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी वाहन अडवून चालकाकडे विचारणा केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर श्रीराम सेना हिंदुस्थानचे तालुका प्रमुख भरत पाटील यांना बोलावून घेण्यात आले व वाहनात पाहिले असता त्यामध्ये अकरा बैल व सात गायी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर खडेबाजार पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. सुटका केलेल्या बैल व गायींची खमकारहट्टी येथील गो-शाळेमध्ये रवानगी करण्यात आली आहे.









