मंद्रूप / अभिजीत जवळकोटे :
नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम… असे गीत म्हणत मंद्रूप येथील पेशवेकालीन श्रीराम मंदिर येथे प्रभू रामचंद्राचे जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांने उत्साहात साजरा झाला.
रामनवमी उत्सवानिमित्त मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शनिवारी रात्रभर जय हनुमान मंडळांने भजन सेवा केली. सकाळी श्रींच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. विनोद कामतकर व केतकी कामतकर यांनी महापूजा केली. ज्ञानेश्वर ग्रामोपाध्ये यांनी महापूजेचे पौरोहित्य केले.
सुलभा कुलकर्णी यांनी देवास वस्त्र अर्पण केले.सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागला होता. महापूजा नंतर श्री रामरक्षा म्हणण्यात आली. जय हनुमान भजनी मंडळ व वीरभद्र भजनी मंडळ यांनी भजन सेवा नंतर गुलाल कार्यक्रम झाला. दुपारी बारा वाजता गुलालाचा कार्यक्रम दरम्यान महिलांनी पाळणा गीत म्हटले. श्रीराम भक्त मंडळातर्फे कैरीचं पन्हे, सुंठवडा, डाळ प्रसाद वाटप केले. प्रा. शिवशंकर रावत व प्रा. उमाशंकर रावत यांनी भाविकांना महाप्रसादा वाटप केले. सुमारे दीड हजार भाविकांनी डाळ भात, शिरा प्रसादाचा लाभ घेतला.
महापूजेसाठी प्रतिष्ठित नागरिक हर्षवर्धन देशमुख, सरपंच अनिता कोरे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी विठ्ठल गंभीरे, अतुल केवटे, सचिन साठे ओंकार झेंडेकर, कौशिक कोळी, अभिषेक म्हेत्रे, गायत्री ग्रामोपाध्ये, गिरीश कुलकर्णी यांच्यासह भाविकानी उत्सव सोहळ्यासाठी मदत केली.








