सावंतवाडी । प्रतिनिधी
श्री पंचम खेमराज महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या राजमाता सत्वाशीला देवी भोसले कनिष्ठ महाविद्यालयाने फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या एचएससी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९८.३८% लागला असून, परीक्षेस बसलेल्या २४७ विद्यार्थ्यांपैकी २४३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे कला शाखेने १००% निकाल नोंदवून आपली श्रेष्ठता सिद्ध केली आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९८.३६% तर विज्ञान शाखेचा निकाल ९८% लागला आहे.महाविद्यालयात विज्ञान शाखेतील कुमारी किंजल अविनाश पै हिने ९१.१७% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर वाणिज्य शाखेतील कुमारी जान्हवी भास्कर मिस्त्री ९०.६७% गुणांसह द्वितीय आणि कुमारी वैभवी रामचंद्र न्हावेलकर ८९.६७% गुणांसह तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
शाखा निहाय निकालाची उत्कृष्ट कामगिरी:
कला शाखा: १००% यश! या शाखेतील ३६ पैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम: कुमारी अदिती सूर्यकांत जाधव – ५१० गुण (८५.००%)
द्वितीय: कुमार केवीन पिंटू – ५०३ गुण (८३.८३%)
तृतीय: कुमारी पूनम सदाशिव परब – ४७० गुण (७८.३३%)
वाणिज्य शाखा: ९८.३६% यश! या शाखेतील ६१ विद्यार्थ्यांपैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम: कुमारी जान्हवी भास्कर मिस्त्री – ५४४ गुण (९०.६७%)
द्वितीय: कुमारी वैभवी रामचंद्र न्हावेलकर – ५३८ गुण (८९.६७%)
तृतीय: कुमार विक्रम भागीरथी बिहारी – ५२३ गुण (८७.१७%)
विज्ञान शाखा: ९८% यश! या शाखेतील १५० विद्यार्थ्यांपैकी १४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम: कुमारी किंजल अविनाश पै – ५४७ गुण (९१.१७%)
द्वितीय: कुमारी वैष्णवी तुळशीदास तावडे – ५०१ गुण (८३.५०%)
तृतीय: कुमार पार्थ राजेश वाडकर – ४८९ गुण (८१.५०%)
एच एस सी परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा सौ. शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.तसेच महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्राध्यापक व्ही. पी राठोड सर, सौ. पूनम नाईक मॅडम, श्री एस एस खोत, श्री एम व्ही भिसे, श्री ए कांबळे, सौ के पी लोबो, श्री आर.बी. सावंत, श्री आर एम सावंत, सौ एम एस ठाणेकर, श्री एम बी आठवले, श्री आर एल लंगवे, श्रीमती एसडी डिसूजा, सौ एस पी भाईप, श्रीमती श्वेता केदार सर्व शिक्षक वर्गातून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले









