ससेगाव येथील श्री हनुमान तरुण मंडळाने जपलेलं समाजभान आदर्शवत ठरत आहे
By : संतोष कुंभार
शाहूवाडी : शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेले ससेगाव. एक गाव एक गणपती संकल्पना 46 वर्ष राबवत असलेले श्री हनुमान तरूण मंडळ. एक आदर्श गणेश मंडळ. सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे ते प्रेरणादायी, आदर्शवत वाटचाल करत आहे. ससेगाव येथील श्री हनुमान तरुण मंडळाने जपलेलं समाजभान आदर्शवत ठरत आहे. संस्थापक सदस्य आबासाहेब पाटील यांच्य मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ आणि युवकांच्या साथीने मंडळाची गौरवशाली गणेशोत्सवाची वाटचाल आदर्शवत आहे.
छत्रपती शाहू महाराजांची परंपरा आणि विचारधारा जपणारे मंडळ आहे. गणेशोत्सव खऱ्या अर्थाने गणेशोत्सव ठरत असतो, आदर्शवत उदाहरण म्हणजेच ससेगाव येथील श्री हनुमान तरुण मंडळांने दाखवून दिले आहे. 46 वर्ष अखंडपणे सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सवाचे नवे रूप उभे केले आहे.
संस्कृतीची जपणूक श्री हनुमान तरुण मंडळाने एक गाव एक गणपती संकल्पना आजही जपली. हे करताना संस्कृती, लोककलांसह शैक्षणिक, सामाजिक बाबींना उजाळा देत सामाजिक दायित्व अधिकच घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजासाठी काहीतरी करावे, या विचारधारेने प्रेरित मंडळातील अनेक जण समाजासाठी योगदान देत आहे
त्यातीलच एक संस्थापक सदस्य आबासाहेब पाटील. हे मराठा चळवळीसह अनेक बाबीतून पुढे आलेले नेतृत्व आहे. 1979 मधील आठवणीतला गणपती गावात गणेशोत्सव करायचा, हे सवंगड्यांना सुचले आणि सवंगड्यांना एकत्र करून 1979 मध्ये माळावर चिखलाचा गणपती बसवण्याचा निर्णय घेतला.
महादेव मंदिरात गणपती बसवला. ज्येष्ठांकडून थोडासा विरोध होऊ लागला. मात्र बालहट्ट म्हणून वडीलधारी मंडळीनी साथ दिली आणि गणेशोत्सव साजरा झाल्याची आठवण आबासाहेब पाटील यांनी सांगितली. आणि गणपती गावात आला माळरानावर चिमुकल्यांनी बसवलेला गणपती गावात यावा, यातून
माळावरील हा गणपती गावात बसवण्यास सुरुवात झाली आणि संपूर्ण गाव एकत्र आला, एक गाव एक गणपती संकल्पना सुरू झाली. आज 46 वर्षे झाली, एक गाव एक गणपती आदर्शवत उपक्रमाने भारावून गेलेलं मंडळ समाजभान जपत आहे. व्यसन मुक्त गाव गावाला छत्रपती शाहूराजांच्या विचाराचा,कार्याचा वारसा लाभला आहे. अशी ही भूमी व्यसनमुक्त गाव म्हणून पुढे येत आहे, ही अभिमानाची बाब आहे.
गाव व्यसनमुक्त झाले आहे. मंडळाचे मार्गदर्शक आबासाहेब पाटील यांच्या विशेष पुढाकाराने ससेगाव सारख्या ग्रामीण भागात नमो चषक बैलगाडी स्पर्धा, देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धाचे आयोजन केले. ग्रामीण भागातील मल्ल राष्ट्रीय पातळीपर्यंत जावा, त्याला योग्य पाठबळ मिळावं यासाठी आबासाहेब पाटील यांनी 10 पैलवान दत्तक घेतले आहेत.
उत्सव काळात जपली जाते विविधता मंडळाकडून गणेश प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. यामध्ये शाहिरी, भेदिक कलगीतुरा, सोंगी भजन गुणवंतांचा गौरव यांचा समावेश आहे. अनोखी शैक्षणिक स्पर्धा शासकीय भरतीमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान केला जातो.
यातून प्रेरणा घेत गावातील अनेक युवक पोलीस, आर्मी, अन्य शासकीय परीक्षेत जिद्दीने यशस्वी होत आहेत. विविध उपक्रमातून सामाजिक दायित्व जपत 46 वर्ष श्री मंडळ ससेगावसारख्या भागात गौरवशाली वाटचाल करत आहे. संस्थापक सदस्य आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची यशस्वी वाटचाल यापुढेही सुरू राहणार आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवण्यास मंडळ कटिबद्ध असल्याचे माजी सरपंच संजय पाटील यांनी सांगितले.








