15 ते 24 ऑक्टोबरदरम्यान निघणार श्री दुर्गामाता दौड
प्रतिनिधी / बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे यावर्षी रौप्यमहोत्सवी दुर्गामाता दौड काढली जाणार आहे. 15 ते 24 ऑक्टोबर या दरम्यान शहर तसेच उपनगरांमधून दुर्गामाता दौड काढली जाणार आहे. दौडचे नियोजन करण्यात आले असून, ते पुढीलप्रमाणे….
रविवार दि. 15 रोजीचा दौडचा मार्ग
रविवारी शिवाजी उद्यान येथून दुर्गामाता दौडला सुरुवात होणार आहे. त्यानंतर हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, एसपीएम रोड, संत सेना रोड, पाटीदार भवन रोड, शास्त्राrनगर, गुड्सशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, आठल्ये रोड, महाद्वार रोड चौथा क्रॉस, माणिकबाग रोड, समर्थनगर, महाद्वार रोड तिसरा व दुसरा क्रॉस, संभाजी गल्ली, एसपीएम रोडमार्गे कपिलेश्वर मंदिरात सांगता.
सोमवार दि. 16 रोजीचा दौडचा मार्ग
चन्नम्मा चौक येथील गणेश मंदिरापासून दौडला सुरुवात होणार आहे. काकतीवेस रोड, खडक गल्ली, कोर्ट, चव्हाट गल्ली, पी. बी. रोड, आरटीओ सर्कल, शिवाजीनगर, फोर्ट रोड, गांधीनगर, परत श्र्री दुर्गामाता मंदिर किल्ला येथे सांगता.
मंगळवार दि. 17 रोजीचा दौडचा मार्ग
शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथून दौडला सुरुवात होणार आहे. एम. जी. रोड, महर्षि रोड, नेहरू रोड, पहिले रेल्वेगेट, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, देशमुख रोड, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, गोवावेस स्वीमिंग पूल, सोमवार पेठ, देशमुख रोड, आर.पी.डी. क्रॉस, खानापूर रोड, अनगोळ क्रॉस, अनगोळ रोड, हरि मंदिर, चिदंबरनगर, हादुगिरी, विद्यानगर, एस.व्ही. रोड, कुरबर गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, भांदुर गल्ली, सुभाष गल्ली, हणमण्णावर गल्ली, मारुती गल्ली, लोहार गल्ली, नाथ पै नगर, बाबले गल्ली, रघुनाथ पेठ, कलमेश्वर गल्ली, महालक्ष्मी मंदिर अनगोळ येथे सांगता.
बुधवार दि. 18 रोजीचा दौडचा मार्ग
सदाशिवनगर येथील बसवाण्णा मंदिरपासून दौडला सुरुवात होणार आहे. पहिला मुख्य क्रॉस, दुसरा क्रॉस, सदाशिवनगर, 2 मुख्य क्रॉस, 4 क्रॉस, हरिद्रा गणेश मंदिर रोड, आंबेडकरनगर, गणेश चौक, मरगाई मंदिर, सदाशिवनगर पहिला मुख्य 4 क्रॉस, 3 क्रॉस, 2 क्रॉस, नेहरूनगर 3 क्रॉस, रामदेव हॉटेल, दुर्गामाता रोड, रामनगर, अशोकनगर, सुभाषनगर, जोतिबा मंदिर, शिवबसवनगर येथे सांगता.
गुरुवार दि. 19 रोजीचा दौडचा मार्ग
धर्मवीर संभाजी चौक येथून दौडला प्रारंभ होणार आहे. किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, अशोक चौक, बसवाण गल्ली, लक्ष्मी मंदिर, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, बुरुड गल्ली, भातकांडे गल्ली, बुरुड गल्ली, मेणसी गल्ली, आझाद गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, भोई गल्ली, बापट गल्ली, पांगुळ गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, कामत गल्ली, पी. बी. रोड, मार्केट पोलीस स्टेशन, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, कोर्ट कॉर्नर, सरदार्स ग्राऊंड रोड, सन्मान हॉटेल, कॉलेज रोड, यंदे खूट, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, बापट गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक मारुती मंदिर येथे सांगता.
शुक्रवार दि. 20 रोजीचा दौडचा मार्ग
श्री दुर्गामाता मंदिर खासबाग येथून दौडला प्रारंभ होणार आहे. भारतनगर 1 क्रॉस, नाथ पै सर्कल, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, मरगाम्मा मंदिर, भारतनगर (हमाल गल्ली) पाचवा क्रॉस, चौथा क्रॉस, रयत गल्ली, ढोरवाडा, सफार गल्ली, दत्त गल्ली, सोनार गल्ली, वडगाव मेन रोड, बाजार गल्ली, माऊती मंदिर तेग्गीन गल्ली, जुने बेळगाव रोड, गणेशपेठ गल्ली, कुलकर्णी गल्ली, कोरवी गल्ली, संभाजी गल्ली, लक्ष्मी मंदिर लक्ष्मी गल्ली, बस्ती गल्ली, खन्नूरकर गल्ली, चावडी गल्ली, रामदेव गल्ली, येळ्ळूर रोड, नाझर पॅम्प क्रॉस नं. 3, हरिजनवाडा, हरिमंदिर, विठ्ठल मंदिर, वझे गल्ली, धामणे रोड, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, आनंदनगर, पाटील गल्ली, संभाजीनगर, पाटील गल्ली मंगाई मंदिर येथे सांगता.
शनिवार दि. 21 रोजीचा दौडचा मार्ग
काँग्रेस रोड येथील शिवतीर्थ येथून दौडला सुरुवात होणार आहे. ग्लोब टॉकीज रोड, इंडिपेंडन्ट रोड, हायस्ट्रीट, चर्चस्ट्रीट, कल्याणी स्वीट मार्ट रोड, गवळी गल्ली, कोर्टस्ट्रीट, वेस्टस्ट्रीट, हायस्ट्रीट कोंडाप्पा स्ट्रीट, चर्चस्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, कुंतीमाता मंदिर, फिश मार्केट, तेलगु कॉलनी, के. टी. पुजारी, दुर्गामाता मंदिर, खानापूर रोड, धर्मवीर संभाजी चौक, दुर्गामाता मंदिर जत्तीमठ (धर्मवीर संभाजी चौक) येथे सांगता होईल.
रविवार दि. 22 रोजीचा दौडचा मार्ग
नाथ पै सर्कल, शहापूर येथील अंबाबाई मंदिरपासून दौडला प्रारंभ होणार आहे. लक्ष्मी रोड, कारवारी गल्ली, लक्ष्मी रोड, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, बनशंकरी नगर, माऊती गल्ली, बसवाण गल्ली, मर्गम्मा गल्ली, वर्धाप्पा गल्ली, उप्पार गल्ली, संभाजी रोड, धारवाड रोड, जोशी मळा, संभाजी रोड, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, पवार गल्ली, खडेबाजार, बसवाण गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, आचार्य गल्ली, विठ्ठलदेव गल्ली, नार्वेकर गल्ली, पी. बी. रोड, होसूर बसवाण गल्ली, बोळमल गल्ली, खडेबाजार, म. फुले रोड, मीरापूर गल्ली, खडेबाजार, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, म. फुले रोड, रामलिंगवाडी, आनंदवाडी, वडगाव रोड, अळवण गल्ली, खडेबाजार, मेलगे गल्ली, जेड गल्ली, भोज गल्ली, दाणे गल्ली, खडेबाजार, दाणे गल्ली, कोरे गल्ली, बसवेश्वर सर्कल गोवावेस येथे सांगता.
सोमवार दि. 23 रोजीचा दौडचा मार्ग
सोमनाथ मंदिर ताशिलदार गल्ली येथून दौडला प्रारंभ होणार आहे. फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनिमंदिर रोड, मठ गल्ली, कलमठ रोड, अनंतशयन गल्ली, टिळक चौक, लोकमान्य रंगमंदिर रोड, कोनवाळ गल्ली, अनुपम हॉटेल रोड, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, शिवाजी रोड, मुजावर गल्ली, कांगले गल्ली, स्टेशन रोड, पाटील गल्ली, फुलबाग गल्ली रोड, ताशिलदार गल्ली, पाटील मळा, भांदुर गल्ली, तानाजी गल्ली पहिले गेट, महाद्वार रोड, तानाजी गल्ली, समर्थनगर क्रॉस चौथा व पाचवा क्रॉस, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिर, कपिलेश्वर ओव्हरब्रिज, शनि मंदिर येथे सांगता होणार आहे.
मंगळवार दि. 24 रोजीचा दौडचा मार्ग
मारुती गल्ली येथील मारुती मंदिरपासून दौडला सुरुवात होणार आहे. नरगुंदकर भावे चौक, श्री महालक्ष्मी मंदिर बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, बसवाण्णा मंदिर, अशोक चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, लोकमान्य रंगमंदिर रोड, कोनवाळ गल्ली, अनसूरकर गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, नार्वेकर गल्ली, शनिवार खुट, काकतीवेस रोड, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, काकतीवेस रोड, कंग्राळ गल्ली, मागील बाजू, सरदार्स ग्राऊंड रोड, कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कल, काळी आमराई, कॉलेज रोड, गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक येथे सांगता होईल.









