प्रतिनिधी
बांदा
इन्सुली येथील श्री देव मुळपुरुष देवस्थानचा देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव शनिवारी दि. 16 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजा त्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे तसेच ओटी भरणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री उशिरा वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन मानकरी व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.









