प्रतिनिधी/ बेळगाव
कणबर्गी रोड, दुसरा बस स्टॉपजवळील चांगदेवनगर येथे श्री चांगदेव उर्फ राजाबाग सवार (यमनूर अज्जा) यांचा यात्रा महोत्सव दि. 18 पासून दि. 23 पर्यंत होणार आहे. दि. 18 रोजी श्री चांगदेव यांचा पालखी रथ श्री सिद्धेश्वर मंदिर, कणबर्गी येथे भेटीला जाईल. 11.15 वाजता व सायंकाळी श्री यमनूर अज्जांचा गंधाभिषेक होईल.
बुधवार दि. 19 रोजी महापूजा व दुपारी 12 नंतर महाप्रसाद होईल. गुरुवार दि. 20 रोजी सायंकाळी 6 वाजता महापूजा, अश्वपूजा व देवस्थानाला पालखी प्रदक्षिणा होईल. दि. 21 रोजी सकाळी 11 पूर्वी दंडवत होणार आहे.
शनिवार दि. 22 रोजी महाप्रसाद असून, सायंकाळी 5 वाजता गुरुपूजा, पालखी उत्सव व भजन-कीर्तन होणार आहे. रविवार दि. 23 रोजी दुपारी गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी भंडार व हबीर उत्सव होईल. रात्री महाप्रसाद होणार आहे.









