वृत्तसंस्था/मुंबई
गुरूवारपासून तामिळनाडूतील 4 शहरात सुरू होणाऱ्या बुचीबाबु निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर मुंबई संघाकडून एकमेव सामन्यात खेळणार आहे.
कोईमुत्तूर येथे 27 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात श्रेयस अय्यर आणि सुर्यकुमार यादव मुंबई संघाचे प्रतिनिधीत्व करतील. सदर स्पर्धा तामिळनाडू क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित केली आहे. मुंबईचा हा सामना जम्मू काश्मिरबरोबर होणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 12 संघांचा समावेश असून त्यामध्ये मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणा, हैद्राबाद, बंगाल, मुंबई, जम्मू-काश्मिर, झारखंड, छत्तीसगड, गुजरात, टीएनसीए इलेव्हन आणि टीएनसीए अध्यक्षीय इलेव्हन संघांचा सहभाग आहे.









