वृत्तसंस्था /कोलकाता
2024 च्या आयपीएल हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाच्या फ्रांचायजीने भारतीय संघातील मध्यफळीत खेळणारा फलंदाज श्रेयस अय्यरची कर्णधारपदी निवड करण्यात आली असून नितीश राणाकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. 29 वर्षीय श्रेयस अय्यरला 2023 सालातील आयपीएल क्रिकेट स्पर्धेला पाठ दुखापतीमुळे मुकावे लागले होते. गेल्या एप्रिलमध्ये अय्यरच्या या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. भारतात नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत श्रेयस अय्यरने आपल्या फलंदाजीत सातत्य राखताना 66.25 धावांच्या सरासरीने 2 शतके आणि 3 अर्ध शतकांसह 530 धावा झोडपल्या होत्या. कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी अय्यरच्या संघातील पुनरागमनाचे स्वागत केले आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अय्यरने भारतीय संघात पुनरागमन केले होते.









