वृत्तसंस्था/ मुंबई
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाने पहिल्या डावाती आघाडीच्या जोरावर उपांत्य फेरी गाठली आहे. आता मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात 2 मार्चपासून खेळविल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी 16 जणांचा संघ जाहीर करण्यात आला असून मध्यफळीतील फलंदाज श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई संघाने आतापर्यंत 41 वेळा रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रेयस अय्यर धावा जमविण्यासाठी झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळते. तसेच त्याला पाठ दुखापतीची समस्या वारंवार जाणवत आहे. या समस्येमुळे 29 वर्षीय अय्यरला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या तीन कसोटीसाठी वगळण्यात आले होते. अय्यरची ही दुखापत आता पूर्णपणे बरी झाली आहे. तर शिवम दुबेला स्नायू दुखापतीची समस्या भेडसावत आहे.
मुंबई संघ – अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, भूपेन लालवाणी, अमोघ भटकळ, मुशिर खान, प्रसाद पवार, हार्दिक तमोरे, शार्दुल ठाकुर, मुलानी, कोटीयन, आदित्य धुमाळ, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस, धवल कुलकर्णी.









