कंगना रनौतचा आगामी चित्रपट
अभिनेत्री कंगना रनौत सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘इमरजेन्सी’वरून चर्चेत आहे. कंगना या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. कंगनाने आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटातील नव्या व्यक्तिरेखेचा खुलासा केला आहे. अभिनेता श्रेयस तळपदे हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार असल्याचे तिने सांगितले आहे.
कंगनाने श्रेयसचा चित्रपटातील फर्स्ट लुक पोस्टर शेअर केले आहे. एक खरा राष्ट्रवादी, ज्यांचे देशासाठीचे प्रेम आणि गौरव अद्वितीय होते आणि जे इमरजेन्सीवेळी एक उदयोन्मुख युवा नेते राहिले असे कंगनाने स्वतःच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

खऱया देशभक्ताची भूमिका
‘बाधाएं आती है आएं, घिरें प्रलय की घोर घटाएं, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते हंसते, आग लगाकर जलना होना, कदम मिलाकर चलना होगा’’ असे श्रेयसने स्वतःचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर करत म्हटले आहे. अटलबिहारी वाजपेयी हे सर्वांचे चाहते, दुरदर्शी, खऱया देशभक्ताची भूमिका साकारण्यासाठी मिळाल्याने मी आनंदी आहे. लोकांच्या अपेक्षांच पूर्तता करू शकेन अशी अपेक्षा असल्याचे श्रेयसने म्हटले आहे.
अनुपर खेर महत्त्वाच्या भूमिकेत
कंगना आणि श्रेयससोबत चित्रपटा अनुपम खेर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अनुपम खेर हे चित्रपटात जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसून येतील. अभिनयासह कंगना या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. तसेच याच्या निर्मितीची धुरा तिनेच पेलली आहे. चित्रपट 25 जून 2023 रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.









