वृत्तसंस्था / दुबई
2024 च्या क्रिकेट हंगामातील आयसीसीच्या सर्वोत्तम महिला इमर्जिंग क्रिकेटपटू पुरस्कारासाठी कर्नाटकाची फिरकी गोलंदाज श्रेयांका पाटीलची शिफारस करण्यात आली आहे.
आयसीसीच्या महिलांच्या इमर्जिंग क्रिकेटपटू पुरस्कार शर्यतीमध्ये आता भारताची श्रेयांका पाटील, द. आफ्रिकेची अॅनेरी डर्कसन, स्कॉटलंडची हॉर्ले आणि आयर्लंडची सार्जंट यांच्यात चढाओढ राहिल. कर्नाटकाच्या 23 वर्षीय श्रेयांका पाटीलने 2023 डिसेंबरमध्ये कॅरेबियन प्रिमीयर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळविली, असा पराक्रम करणारी श्रेयांका ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. 2023 च्या डिसेंबरमध्ये श्रेयांकाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून तीने आतापर्यंत 13 टी-20 सामन्यात 15 बळी मिळविले आहेत. तसेच तिने दोन वनडे सामन्यात 4 गडी बाद केले आहेत.









