भाग्यश्री पटवर्धनचा मुलगा
बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीचा पुत्र अभिमन्यू दसानी सध्या चर्चेत आहे. अभिमन्यू लवकरच ‘नौसीखिए’ चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष सिंह यांच्याकडून करण्यात आले असून यात अभिमन्यूसोबत अमोल पाराशर तसेच श्रेया धन्वंतरी दिसून येणार आहे.

अभिमन्यू या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान अभिनेत्री श्रेयाच्या प्रेमात पडल्याची चर्चा आहे. श्रेया अन् अभिमन्यू हे परस्परांना डेट करत आहेत. भोपाळमधील एक महिन्याच्या चित्रिकरणादरम्यान ते परस्परांना आवडू लागले आहेत. दोघेही परस्परांबद्दल अत्यंत सीरियस असल्याचे सांगण्यात येत आहे.

दोघांनीही अद्याप स्वत:च्या रिलेशनशिपची वाच्यता केलेली नाही. परंतु अलिकडेच दोघांनी नौसीखिएचे चित्रिकरण संपविले आहे. नौसीखिए हा चित्रपट एका विवाहानंतर घडणाऱ्या घडामोडींवर आधारित आहे. या चित्रपटाची कहाणी चिराग गर्ग अणि अविनाश द्विवेदी यांची आहे.
अभिमन्यू अलिकडेच शिल्पा शेट्टी आणि शर्ली सेतियासोबत ‘निकम्मा’ या चित्रपटात दिसून आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. तर श्रेया अलिकडेच सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट ‘चू’मध्ये दुलकर सलमान आणि सनी देओलसोबत दिसून आली होती.









