सलग चौथ्या वर्षी राष्ट्रीय कला उत्सवात स्पर्धेत वराडकर हायस्कूल सहभागी होणार
मालवण प्रतिनिधी
पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत त्रिमित शिल्प या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेल्या वराडकर हायस्कूल कट्टाची विद्यार्थिनी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिची राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेसाठी निवड झाली असून दि ३ जानेवारी ते ७ जानेवारी २०२५ या कालावधीत भोपाळ ,मध्यप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत सलग चौथ्यांदा सहभागी होणारी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा ही जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील एकमेव शाळा आहे.
शालेय शिक्षण मंत्रालय व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली आयोजित नोव्हेंबर २०२४ मध्ये एस. सी. ई. आर. टी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत वराडकर हायस्कूल कट्टाची विद्यार्थिनी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने त्रिमित शिल्प या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. कु श्रेया ही दि ३ जानेवारी ते ७ जानेवारी २०२५ या कालावधीत भोपाळ ,मध्यप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्र राज्यातील एक विजेता संघ व पाच विजेते विद्यार्थी यामध्ये श्रेया हीचा समावेश आहे. यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेत तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. या विद्यार्थिनीला कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले.
कुमारी श्रेया चांदरकर हिचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त ॲड.एस .एस. पवार, कर्नल शिवानंद वराडकर , अध्यक्ष श्री अजयराज वराडकर उपाध्यक्ष श्री.आनंद वराडकर ,श्री शेखर पेणकर , सचिव श्री सुनील नाईक,श्रीमती विजयश्री देसाई, खजिनदार रवींद्र पावसकर शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर, सहसचिव एस.डी. गावडे व सर्व संचालक मंडळ ,माजी मुख्याध्यापक श्री अनिल फणसेकर, श्री.दीपक पेणकर, श्री विजय शेट्टी, मुख्याध्यापक सौ देवयानी गावडे, सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे









