‘सातेरी माता की जय, सातेरी मातेचा विजय असो’ जयघोषाने बेतकेकरवाडा परिसर दुमदुमला
वाळपई : सत्तरी तालुक्यातील नाणूस बेतकेकरवाडा येथील श्री सातेरी ब्राह्मणी देवस्थानचा होमकुंड उत्सव शेकडो भाविकांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. गोव्याच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांच्या साक्षीने तसेच अखंड नामजपात धोंडगणानी देवीच्या नावाचा नामजप करीत होमकुंड पार केले. वाळपई नगरपालिका क्षेत्रातील नाणूस बेतकेकरवाडा हा गाव ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला सातेरी ब्राह्मणी महादेव देवस्थान जत्रोत्सव गोव्यात धर्तीवर सुप्रसिद्ध आहे. यंदा हा 25,26 एप्रिल रोजी साजरा झाला. असून यामुळे गावांमध्ये देवस्थानाच्या काही धोंड गणानी गेल्या पंधरा दिवसांपासून अत्यंत व्रतस्थ राहण्यास सुऊवात केली हेती. 26 रोजी रात्री नऊ वाजता सातेरी देवस्थानाच्या प्रांगणातून देवीची कळस मिरवणूक भाविकांच्या उपस्थितीत महादेव देवस्थानाकडे आली. यावेळी देवस्थानचे सर्व व्रतस्थ धोंड सदर मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. सातेरी ब्राह्मणी महादेव देवस्थानाचा जयघोष करीत ही मिरवणूक रात्री दहा वाजता महादेव देवस्थानात आली. त्यानंतर पावणी कार्यक्रम सुरू झाला. सादर करण्यात आला व पहाटे साडेतीन वाजता व्रतस्थ धोंडगण अग्निदिव्य पार केले. 7 रोजी देवीचे कळस गावातील प्रत्येक घराघरात गेल्यानंतर यावेळी धार्मिक व पारंपरिक पूजविधी पार पडला. आरोग्यमंत्री विश्वजित राणे व पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी देवदर्शन घेऊन त्यांनी उभयतांनी होमकुंडाला प्रदक्षिणा घातली. यावेळी स्थानिक नगरसेवक शेख फैजल यांची उपस्थिती होती.









