श्री माटेश्र्वर मित्रमंडळाचे नवरात्रोत्सव निमित्त आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
सांगेली मधलावाडा काजरमळा येथील श्री माटेश्र्वर मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत सांगेली येथील श्री सनामदेव प्रासादिक भजन मंडळ प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत कुडाळ वर्दे येथील श्री दत्त प्रासादिक भजन मंडळाने द्वितीय क्रमांक तर नेरूर येथील श्री कलेश्वर प्रासादिक भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला.
स्पर्धेचा उर्वरीत निकाल पुढीलप्रमाणे उत्तेजनार्थ श्री रामकृष्ण हरी महिला भजन सेवा संघ (तेंडोली), उत्कृष्ट गायक नरेंद्र मेस्त्री (श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ वर्दे), उत्कृष्ट तबला भावेश राणे आणि उत्कृष्ट पखवाज सचिन पांगम दोघेही (श्री सनामदेव प्रासादिक भजन मंडळ, सांगेली), उत्कृष्ट हार्मोनियम बुवा मिहीर मेस्त्री (श्री कलेश्वर प्रासादिक भजन मंडळ नेरूर), उत्कृष्ट झांजवादक बुवा संतोष नाईक (श्री सदगुरु प्रासादिक भजन मंडळ तुळस), उत्कृष्ट कोरस श्री ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ (नेमळे)
स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी सरपंच लवू भिंगारे, उपसरपंच संतोष नार्वेकर, सांगेली माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र घावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, शांताराम सावंत, बुवा संतोष धरणे सागर सांगेलकर, माटेश्वर क्रिकेट मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर पारितोषीक प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, ग्रामपंचायत सदस्य सागर सांगेलकर, गुरुप्रसाद राऊळ, वसंत रेमुळकर, दीपक सावंत, उत्तम राऊळ,अनिल राऊळ, राजाराम राऊळ, परिक्षक योगेश प्रभू, मनीष तांबोस्कर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना ५००१ रुपये, ३००१ रूपये, २००१ रूपये तर उत्तेजनार्थ १००१ रूपये तसेच स्पर्धेतील उकृष्ट गायक, पखवाज वादक, तबला वादक, हार्मोनियम वादक, कोरस आणि झांज वादक यांना प्रत्येकी ५०१ रुपयाचे पारीतोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक ८ भजन संघांना निमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेला भजन रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून योगेश प्रभू आणि मनीष तांबोस्कर यांनी काम पाहिले.









