कुंभोज तालुका हातकणंगले येथे विठ्ठल नामाचा गजर करत आज बिरदेव मंदिर कुंभोज येथून श्रीहरी भजनी मंडळ शिरढोण यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभोज येथून 25 पेक्षा जास्त लोकांची श्रावण पायी पंढरपूर दिंडीचा प्रारंभ करण्यात आला. गेल्या पंचवीस वर्षाची परंपरा असणाऱ्या सदर दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला. अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिंडीचे, विना व पताकांचे पूजन करून सदर दिंडीची सुरुवात केली.
कुंभोज येथील अण्णा घोदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वीस वर्षापासून सदर दिंडी मार्गस्थ होत आहे. सदर दिंडीमध्ये गेल्या पाच वर्षापासून भिकाजी पुजारी हे कुंभोज ते पंढरपूर दंडवत घालत दिंडी पूर्ण करतात. त्यांची ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून आबादित असून इथून पुढेही ती चालूच राहणार असल्याचे मत भिकाजी पुजारी यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
आज सकाळी अखंड हरिनामाचा गजर करीत बिरदेव मंदिरातुन श्रावण पायी दिंडीला सुरुवात झाली. माऊली-माऊली ज्ञानेश्वर माऊली, ग्यानबा तुकारामच्या गजराने परिसर दणदणून निघाला. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी दिंडीला सुरुवात झाल्याने आज मोठ्या प्रमाणात भाविकांनी दिंडीच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. अनेक ठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले. परिणामी कुंभोज परिसरात कुंडले महाराज व अण्णा घोदे यांच्या माध्यमातून अनेक लोक धार्मिक तेकडे वळले असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर दिंडीसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
Previous Articleव्हीनस कॉर्नरवरील राजाराम महाराजांचा पुतळाही मुळ ब्राँझ स्वरुपात
Next Article श्रावण सोमवारसाठी ट्राय करा उपवासाची चटपटीत मिसळ









