ऑनलाईन टीम/ तरुण भारत
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील (shradha walker murder case) आरोपी आफताब पुनावाला (aftab poonawalla) याच्यावर दिल्लीत तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात घेऊन जात असताना काही तरुणांनी त्यावेळी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर हल्ला करणारे ते तरुण हिंदू सेनेचे सदस्य असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये (Delhi) फॉरेन्सिक लॅबच्या बाहेर आफताबवर हा हल्ल्याचा प्रयत्न झाला. आफताबला ज्या पोलीस व्हॅनमधून नेण्यात आलं, त्या पोलीस व्हॅनवर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी हातात तलवारी घेऊन हल्ला चढवला. प्रतिकार करण्यासाठी पोलिसांना बंदूक काढावी लागली. पुढच्या वेळी आफताबला गोळ्या घालून ठार करु, असा इशारा हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय.
आफताबला तुरुंगात नेत असताना झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. तलवारीने वार करत असलेल्या आरोपींना रोखण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने आपली बंदुक काढून हवेत गोळी झाडण्याचाही इशारा दिला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करूनही आरोपींनी तलवारींनी पोलीस व्हॅनवर वार करणे सुरुच ठेवले. अखेर गाडी चालकाने हा हल्ला करण्याचा प्रयत्न होत असताना गाडी पुढे नेली.