ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Shraddha Walker Murder case श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. आरोपी आफताब पूनावाला याने जंगलात टाकलेली श्रद्धाची हाडं आणि श्रद्धाच्या वडिलांच्या रक्ताची डीएनए चाचणी यांचे रिपोर्ट मॅच झाले आहेत. त्यामुळे ‘ती’ हाडं श्रद्धाचीच असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
श्रद्धा हत्याकांड प्रकरणात आफताबने कबुली दिली असली तरीही पोलिसांची फॉरेन्सिक अहवालावर मदार होती. फॉरेन्सिक लॅबमध्ये आफताबची पॉलीग्राफी चाचणी सुरु झाल्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. श्रद्धासोबतच्या नात्यावर प्रश्न विचारताच तो थोडा अस्वस्थ झाला व पाणी मागू लागला. त्यानंतर आफताबने शांतपणे उत्तरे दिली. या चाचणीत त्याला 40 ते 50 प्रश्न विचारण्यात आले. नियोजित पद्धतीने हत्या केली की रागातून? मृतदेहाचे तुकडे करण्याचा व फेकण्याचा निर्णय का घेतला? मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर केला? शस्त्रे कुठे लपविली? हे प्रश्न त्याला विचारले. हे प्रश्न हिंदीत विचारले आणि त्याने याची इंग्रजीतून उत्तरे दिल्याचे सांगण्यात येते.
अधिक वाचा : कोकणात तुरळक पाऊस; विदर्भात थंडी
दरम्यान, जंगलात सापडलेली हाडं आणि श्रद्धाच्या वडिलांच्या रक्ताचा डीएन चाचणीचा रिपोर्ट मॅच झाला आहे. विशेष म्हणजे आफताबच्या रुमवर टाईल्समध्ये जे ब्लड सॅम्पल मिळालं होते, त्याचंही डीएनए मॅच झालेलं आहे. त्यामुळे आफताबविरोधी मोठा पुरावा पोलिसांना मिळाला आहे.