Shraddha Walkar Murder case : श्रद्धा वालकरच्या वडिलांचा डीएनए दक्षिण दिल्लीच्या मेहरौली येथील जंगलातून सापडलेल्या हाडांशी जुळला असल्याची पुष्टि फॉरेन्सिक विश्लेषण अहवालाने दिली असून या गंभीर हत्या प्रकरणातील महत्वाचा पहिला पुरावा मानला जात आहे. या संदर्भातील माहीती दिल्ली पोलिसांनी दिली.
फॉरेन्सिक अहवालाची माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाला की, “मेहरौलीच्या जंगलात सापडलेले मानवी अवशेष हे क्षद्धा वालकरचेच असून सीबीआयच्या सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (सीएफएसएल)मध्ये ही पुष्टी झाली आहे.”
27 वर्षीय वालकरची 18 मे रोजी तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने त्याच्या दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर पहाडी भागात एका फ्लॅटमध्ये हत्या केली होती. पूनावाला याने मृतदेहाचे ३५ तुकडे करून दक्षिण दिल्लीतील मेहरोली जंगलात फेकून दिले होते. पूनावाला याने पोलिसांना श्रद्धा वालकरच्या शरीराचे अवयव फेकल्याची ठिकाणे दाखवली होती. त्यानंतर पोलीसांनी मेहरौली, छत्तरपूर आणि गुरुग्रामजवळील जंगली भागातून 13 कुजलेली हाडे जप्त केली करून फॉरेन्सीक तपासणीसाठी पाठवली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









