ओटवणे प्रतिनिधी
ओटवणे येथील रवळनाथ विद्यामंदिरचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेला बसलेले सर्व १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम क्रमांक श्रद्धा संतोष चिले ९४.६० % (५०० पैकी ४७३ गुण) द्वितीय क्रमांक प्रणाली आनंद परब ९१.६० % (५०० पैकी ४५८ गुण) कुंदन नवीन भराडी ९०% (५०० पैकी ४५० गुण) या विद्यार्थ्यांनी पटकाविला. तर विशेष श्रेणीत १३ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ३ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर, सचिव राजाराम वर्णेकर, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









