राज्य सरकारच्या कोणत्याही दबावाला बळी पडू नका. तुमच्या सर्व संघटनामध्ये एकी ठेवा. महाविकास आघाडी म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही केवळ सकारात्मक चर्चा करू नका.येत्या अधिवेशनात जुन्या पेन्शनचा निर्णय जाहीर करा. येत्या 14 मार्चला सर्व सरकारी कार्यालय बंद ठेवून एकजूट दाखवा असे आवाहन माजी पालकमंत्री आणि आमदार सतेज पाटील यांनी केल. आज कोल्हापुरात बोलत होते.
आज सकाळपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कोल्हापुरात राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला. शासकीय, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच नेते य़ामध्ये सहभागी झाले होते. गांधी मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चाला संबोधताना सतेज पाटील यांनी सर्व सरकारी कार्यलय बंद ठेवून एकजूट दाखवण्याचे आवाहन केले.
Previous Articleकोल्हापुरात उपचारासाठी आणलेल्या कैद्याचे पलायन
Next Article कोल्हापुरात गोवा बनावटीचा 67 लाखांचा मद्यसाठा जप्त









