वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताचे अव्वल मुष्टीयोद्धे अमित पांगल आणि रोहित मोर यांना आशियाई स्पर्धेसाठी चीनला प्रयाण करण्यास एक दिवस बाकी असताना अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या दोन्ही मुष्टीयोद्ध्यांनी शिस्तपालन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक विजेता अमित पांगल तसेच 57 किलो वजन गटातील राष्ट्रीय विजेता रोहित मोर व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारा 92 किलोवरील गटातील मुष्टीयोद्धा सागर अहलावत यांनी पतियाळा येथे आयोजिलेल्या सराव शिबिरावेळी परवानगी न घेताना बाहेर गेल्याने त्यांच्यावर कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 4 सप्टेंबर रोजी हे मुष्टीयोद्धे कुणाचीही परवानगी न घेताना पतियाळातील या शिबिरातून बाहेर पडले होते.









