कोल्हापूर : गेल्या वर्षभरात गोकुळमध्ये अनेक चुकीचे निर्णय झाले. वेळोवेळी पाठपुरावा केला. पण त्याची उत्तरे दिली नाहीत. केवळ बदनामी करून सत्ता मिळवलेल्या सत्ताधाऱ्यांनी त्याची उत्तरे द्यावीत. तसेच जुन्या दूध संस्थाची परवानगी न घेता त्याला मंजुरी कोणी दिली. याची सभेत अपेक्षित उत्तरे न मिळाल्यास समातंर सभा घेणार, असल्याचा इशारा गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी दिला. त्या आज पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
अपेक्षित उत्तरे नाही मिळाली तर आम्ही समातंर सभा घेणार, असल्याचे महाडिक यांनी सांगितले. आगामी निवडणूक आणि संस्था ताब्यात राहण्यासाठी नवीन संस्था काढण्याचे काम सुरु आहे. असा आरोप गोकुळ दूध संघाच्या संचालिक शौमिका महाडिक यांनी केला. सध्या गोकुळ मध्ये दूधवाढ झाली. पण सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न नसून ती नैसर्गिक वाढ आहे, असेही महाडिक म्हणाल्या.
गेल्या वर्षाभरात गोकुळ दूध संघात अनेक चुकीचे निर्णय घेतले. त्याबद्दल मी आवाज उठवत आहे. पण वर्षभर उत्तर दिले नाही. असेही महाडिक यांनी सांगितले.
हे ही वाचा : मग्रूर रावणामुळे रामायण घडले, खासदार धनंजय महाडिकांचा बंटी पाटलांना टोला
महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना विस्तारीकरणला आमचा विरोध राहिल. कारण गोकूळने ना नफा, ना तोटा या तत्वावर हा कारखाना चालवायला घेतला. त्यावेळी ५ कोटीचे अनुदान गोकूळ ने कारखान्याला दिले. अनुदान काढून टाकले तर फायदा शून्य टक्के. आधीच हा कारखाना तोट्यात गेला आहे. विस्तरीकरण करून सभासदांना तोट्यात टाकू नका, अशी मागणी संचालिका शौमिका महाडिक यांनी केली.
महानंदाला पॅकिंगचा ठेका दिला याला सुद्धा विरोध आहे. वासाचे दूध संस्थांना परत करावे. हा मुद्दा होता आता तुम्ही किती संस्थांना ते परत केले त्याची आकडेवारी द्या, अशी मागणी महाडिक यांनी केली.
वासाच्या दुधाच्या नावाखाली गोकूळच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी बदनामी केली. त्याचा आता हिशोब द्या. येणाऱ्या सभेला दोन भयानक प्रश्न आहेत. त्याचे उत्तर चेअरमन यांनी स्वतः उत्तरे द्यावीत. आमच्या सोबत असताना चेअरमन यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले की नाही. याचे उत्तर त्यांनीच द्यावे. असेही महाडिक म्हणाल्या.
अनेकांनी दूध कंपन्यानी जिल्ह्यात शिरकाव केला आहे. गोकुळला येणारे दूध इतरांना वर्ग होतं आहे. अनेक दूध संस्था वाढवण्यासाठी जुन्या दूध संस्थाच्या परवानग्या घेतल्या का? जिल्ह्यात साडे चारशे संस्था नव्याने नोंद झाली. याची माहिती सत्ताधाऱ्यांनी द्यावी. अशी मागणी शौमिका महाडिक यांनी केली.