कोल्हापूर: राज्यसभेच्या निवडणुकीचे मतदान आणि निकाल हे आजच होणार असून यात नेमके कोण बाजी मारणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच राज्यसभेसाठी सुरवातीपासूनच कोल्हापूर हे केंद्रबिंदू ठरले आहे. कोल्हापूरातून शिवसेनेचे संजय पवार (Sanjya Pawar) तर भाजपाचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यापैकी कोण वर्णी लावणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आज सकाळपासूनच कोल्हापुरात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपलाच विजय होणार या मतावर ठाम आहेत. दरम्यान आज शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी विजयाची खात्री वाटते अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर विश्वास असल्याचेही सांगितले. कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) व महाडिक या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Rajyasabha Election 2022 Live in kolhapur)
हेही वाचा- जाणून घ्या; राज्यसभा निवडणूकीचे अपडेट
शौमिका महाडिक म्हणाल्या, मनात घालमेल आहे भिती आहे. पण ही पक्षीय निवडूक आहे. मला पक्षश्रेष्ठींवर, पक्षाच्या नेतृत्वार विश्वास आहे. ज्या पध्दतीने भाजप नेते देवेंन्द्र फडणवीस आणि चंद्रकांतदादांनी जोडणी लावली आहे त्यामुळे विजयाची खात्री वाटते. अशी प्रतिक्रिया शौमिका महाडिक यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
हेही वाचा- चांगली झोप लागली, भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होतील हे जाहीर करा; धनंजय महाडिक
तब्बल चोविस वर्षानंतर राज्यसभेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले असून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. आतापर्यंत २६० आमदारांचे मतदान पार पडले आहे. मुंबईत भाजपा पक्षकार्यालयासमोर कार्यकर्ते विजय उत्सवाचा जल्लोष व्यक्त करत आहेत. भव्य असा स्टेज उभा केला आहे. धनंजय महाडिक निवडून येणार अशा भावना कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









