अलीकडेच ‘नेटफ्लिक्स’वर आयुष्यमान खुरानाचा ‘डॉक्टर जी’ नावाचा सिनेमा बघितला. हा सिनेमा एका महत्त्वाचा सामाजिक विषयाला एक आगळावेगळा दृष्टिकोन देतो. आयुष्मान खुराना हा बॉलीवूडमधला अनेकांचा लाडका अभिनेता आहे. कोणत्याही ओळखीशिवाय शून्यातून पुढे आलेल्या आयुष्यमानने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे घर केले आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट दरवेळेला एक वेगळा सामाजिक विषय लोकांसमोर मांडतो. मग तो विकी डोनर असो, बधाई हो किंवा आर्टिकल 16, प्रत्येक चित्रपट लोकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांना त्यातील सामाजिक विषयांबद्दल विचारदेखील करायला लावतात.
डॉक्टर जी या चित्रपटात आयुष्यमान खुरानाने उदय गुप्ता नावाच्या एका डॉक्टरची भूमिका निभावली आहे. लहानपणापासून हाडे आणि स्नायुंचा डॉक्टर होण्याचे स्वप्न त्याने बघितलेले असते. पण परीक्षेत थोडे कमी मार्क मिळाल्यामुळे नाईलाजाने त्याला स्त्रीरोगशास्त्र विभागात प्रवेश घ्यावा लागतो. बऱ्याच ठिकाणी अजूनही अनेक स्त्रिया महिला स्त्रीरोगतज्ञाकडेच जाणे पसंत करतात. हीच भीती आणि विचारामुळे तो स्त्रीरोगशास्त्र विभागात जायला संकोच करत असतो. आपला सामाजिक इतिहास बघता असे वाटणे साहजिक आहे की बऱ्याच लोकांना आजही पुऊष स्त्रीरोगतज्ञाकडे जाणे पसंत नाही. मनामध्ये भीतीदेखील वाटणे साहजिक आहे. पण हा चित्रपट या विषयाकडे एका नवीन दृष्टिकोनाने बघायला आपल्याला भाग पाडतो.
100 वर्षांपूर्वी स्त्रियांसाठी शारीरिक स्वच्छतेसाठी साधने आणि वैद्यकीय सेवा अतिशय मर्यादित होती. मासिक पाळी येणे ही खूप दूषित गोष्ट मानली जायची. त्यामुळे, स्त्रियांना त्यांच्या स्वत:च्या शरीराच्या कार्याबद्दल शिक्षित केले जायचे नाही. विकासाच्या अभावामुळे, ऊग्णालयेदेखील सर्व आपत्कालीन परिस्थितीसाठी सुसज्ज नसत. म्हणूनच कित्येक स्त्रिया आपल्या बाळाला एखाद्या वरिष्ठ स्त्रीच्या उपस्थितीत घरातच जन्म द्यायच्या. पुऊष आणि स्त्रीमध्ये भरपूर भेदभाव होत असे आणि म्हणूनच स्त्रियांना स्वत:च्या समस्यांबद्दल मोकळेपणाने बोलायचे स्वातंत्र्य नव्हते. पण आता गोष्टी बदलल्या आहेत. जागतिकीकरण आणि विकासामुळे आज जागोजागी ऊग्णालये उघडली आहेत. बऱ्याच शाळांमध्ये स्त्रीरोगाबद्दल, स्त्रियांच्या शारीरिक स्वच्छतेबद्दल आणि त्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध साधनांबद्दल माहिती दिली जाते.
हा चित्रपट नुसताच मनोरंजक नाही तर शैक्षणिकदेखील आहे. आता बऱ्याच लोकांची ही शंका असते की मी स्त्री म्हणून एखाद्या पुऊषाकडे तपासणीसाठी कशी जाऊ? या चित्रपटात याला उत्तर म्हणून एक खूप महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉक्टर उदय गुप्ता (आयुष्यमान खुराना) जेव्हा एका गर्भवती स्त्रीची तपासणी करायला सुऊवात करतो, तेव्हा ती घाबरून आरडाओरड करते. तेव्हा त्याची शिक्षिका आणि ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर नंदिनी (शेफाली शाह) त्याला सांगते की वैद्यकीय आचारसंहितेमध्ये लिहिले आहे की जेव्हा एखादा पुऊष डॉक्टर, स्त्री ऊग्णाची तपासणी करत असेल, त्या वेळेला तेथे एक महिला नर्स उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. तसेच, यातील दुसरा पैलू बघितला तर तो आहे महिला स्त्रीरोगतज्ञ आणि पुऊष स्त्रीरोगतज्ञ यात कोण जास्ती चांगले आहे? चित्रपटात जेव्हा उदय गुप्ता या विभागात अॅडमिशन मिळण्याबद्दलचे असमाधान डॉक्टर नंदिनींपुढे मांडत असतो, तेव्हा तो म्हणतो, ‘मी काय करू? सगळ्या ऊग्णांना महिला डॉक्टरच हव्या असतात.’ त्यावर डॉक्टर नंदिनी त्याला एकच वाक्मय बोलून गप्प करतात आणि ते म्हणजे, ‘हे महिला आणि पुऊष काय असतं? डॉक्टर हा डॉक्टर असतो. ऊग्ण जरी असा विचार करत नसले तरी डॉक्टर म्हणून तुम्ही तरी असा विचार करायला सुऊवात करा!’
एखाद्या महिला डॉक्टरला दाखवायला जाताना कोणताही पुऊष किंवा स्त्री घाबरेल याची शक्मयता खूप कमी आहे पण एका पुऊष स्त्रीरोगतज्ञाकडे जाण्याआधी कोणतीही स्त्री 100 वेळा विचार करेल. असे का? कारण स्त्री-पुऊष भेदभाव हे एक कारण तर आहेच त्याचबरोबर स्त्रियांना असे शिकवले जाते की त्यांच्या लैंगिक अवयवांशी निगडित कोणतीही गोष्ट ही लज्जास्पद आहे आणि ती लपवून ठेवली पाहिजे. जेव्हा आपण स्त्रियांना शुद्धतेचे प्रतीक मानतो तेव्हा त्यांच्या वैयक्तिक अगदी साधारण वाटणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो. चांगली वैद्यकीय सेवा हा प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे. मग उपचार करणारा डॉक्टर स्त्री असो किंवा पुऊष असो, त्यांचे ध्येय एकच असते, आणि ते म्हणजे त्यांच्याकडे आलेल्या ऊग्णाचा उपचार.
खरं तर या वैद्यकीय विभागाला स्त्रीरोग विभाग का म्हटले गेले ते शंकास्पद वाटते. कारण मासिक पाळी येणे, स्त्री गर्भवती असणे आणि बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या शरीराला बरे व्हायला लागणारी काळजी या सर्व गोष्टी ‘एक रोग’ कधी झाले हेच कळत नाही. बाळंतपण ही देवाची आणि निसर्गाची देणगी आहे आणि ही जबाबदारी स्त्रीवर सोपवली आहे कारण ती ही मोठी जबाबदारी पेलायला सक्षम आहे. या गोष्टींच्या बाबतीत लाज वाटण्यासारखे काय आहे? उलट स्त्री जर नसली, तर हे जगच राहणार नाही.
या सगळ्या विषयांना चित्रपटात सुरेखपणे हाताळले आहे. कोणत्याही प्रकारचे अंग प्रदर्शन नाही, नाहक जवळीक नाही किंवा अयोग्य माहिती नाही. नुसताच मुलांचा नाही, तर मुलींचादेखील या विषयावरचा दृष्टिकोन या चित्रपटाद्वारे बदलू शकतो. मुलांच्या दृष्टिकोनातून बघितले तर ज्या मुलांना किंवा पुऊष डॉक्टर्सना या विषयाबद्दल काही विचित्र वाटते त्यांनी या चित्रपटातून ही शिकवण घेतली पाहिजे की वैद्यकीय आरोग्य सेवा ही पुऊष किंवा स्त्री बघून दिली जात नाही. माणसाला योग्य आणि गरजेचा उपचार करणे हीच डॉक्टरची जबाबदारी आहे.
तर महिला दृष्टिकोनातून पहिले तर आपल्या शरीराबद्दल लाज वाटण्याची काही गरज नाही. गर्भाशय आणि बाळंतपण ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे ज्याच्याकडे लज्जास्पद दृष्टिकोनाने न बघता, जबाबदारी म्हणून बघितले पाहिजे. कारण शेवटी पुऊष असो किंवा स्त्री, आहोत तर आपण सगळे निसर्गाचा भाग असलेले मानवी जीवच ना?
– श्राव्या माधवकुलकर्णी








