मिरज :
शहरातील मंगळवार पेठ येथे एकाच समाजातील तऊणांच्या दोन गटात पूर्ववैमनस्य व वर्चस्ववादातून बुधवारी दुपारी जोरदार राडा झाला. मिरज ख्रिश्चन चर्चसमोर असलेल्या सलून दुकानात तोडफोड करण्यात आली. दुसऱ्या गटाकडून अडवणूक सुरू असताना एकाने हवेत गोळीबार कऊन दहशत माजविली. तसेच कोयते व तलवारींचा धाक दाखविण्यात आला. भरदिवसा गोळीबारची घटना घडल्याने खळबळ उडाली. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
रोहन कलगुटगी याने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयीत गणेश तानाजी कलगुटगी, चेतन कलगुटगी, सूरज कोरे, अनिल फौजदार अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तऊणांच्या टोळीकडून भरदिवसा दहशत माजविण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आल्याने शहरात टोळी युध्द भडकण्याची शक्यता आहे.
रोहन फिर्यादीनुसार, बुधवारी दुपारी तो मिरज ख्रिश्चन चर्चसमोर वैभव यादव याच्या सलून दुकानात बसला होता. याचवेळी गणेश तानाजी कलगुटगी याच्यासोबत वाद झाला. यापूर्वीही त्या दोघांमध्ये वादावादी झाली होती. पुन्हा भांडण झाल्याने दोघांची झटापट सुरू होती. यावेळी गणेश कलगुटगी याने कंबरलेला लावलेली पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. त्यानंतर त्याचे अन्य साथीदार चेतन कलगुटगी, सुरज कोरे, अनिल फौजदार आदींनी संगनमत करत सलून दुकानाचीही तोडफोड कऊन परिसरात दहशत निर्माण केली. रोहन याचे साथीदार येत असताना संशयीत चौघेजण दुचाकीवऊन पळून गेले.
याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळाली. पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, निरीक्षक किरण रासकर, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे निरीक्षक संतोष गादेकर आदी घटनास्थळी आले. पोलिसांनी पंचनामा केला. घटनास्थळी पिस्तूलचे एक निकामी काडतूस मिळून आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोर तऊणांची ओळख पटविण्यात आली. प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहिनुसार संशयीत गणेश कलगुटगी यानेच फायरिंग केल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. याबाबत रोहन कलगुटगी याने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयीत हल्लेखोर परागंदा झाले आहेत.
- वर्चस्ववादातून तरुणांची दहशत
चर्चच्या पाठीमागे राहण्यास असलेल्या या तऊणांच्या एकाच समाजामध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाला राजकीय वरदहस्त लाभला आहे. या गटाकडूनच गल्लीवर राज्य करण्याचा प्रयत्न सुरू असतो. यापूर्वीही गणेशोत्सव, नवरात्रोत्सव कालावधीत अशा प्रकारे राडा झाला होता. मात्र दोन गट परस्पर वाद मिटवित होते. मात्र, त्यांच्यातला वर्चस्ववाद अद्याप संपला नसल्याचे दिसून येत आहे. माझा गट भारी की तुझा गट भारी? यावऊन या गटांमध्ये सामाजिक माध्यमांवर वेगवेगळी पोस्ट टाकून इर्शा सुरू असते. याच वर्चस्ववादातून गोळीबाराची घटना घडल्याची चर्चा घटनास्थळी होती. दोन्ही गट गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने टोळी युध्द भडकण्याआधी पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
- सलून दुकान बनले गुन्हेगारांचे अड्डे
दरम्यान, शहरात पुन्हा गुन्हेगारी फोफावली आहे. हॉटेल तोडफोड, कोयता हल्ले करण्यासह दहशत माजविणारे गुंड सक्रिय झाले आहेत. मागीलवेळी एका सलून दुकानातच गुन्हेगारांच्या दोन टोळ्या एकमेकांना भिडल्या होत्या. पुन्हा सलून दुकानातच असा राडा झाला आहे. त्यामुळे सलून दुकाने गुन्हेगारांचे अड्डे बनल्याचे दिसत आहे. मोठ्या गुह्यातील सराईत गुन्हेगार जामीनावर मुक्त असल्याने त्यांनी आपल्या टोळ्या पुन्हा सक्रिय केल्या आहेत. अशा टोळ्यांना राजकीय वरदहस्त लाभत असल्याने याच टोळ्यांकडून कॅसिनो, जुगार अड्डे चालविले जात आहेत. बेकायदेशीर धंदे आणि गल्लीबोळातील वर्चस्ववादातून गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये वारंवार एकमेकांवर हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यास पोलिस प्रशासन फेल ठरत आहे.








