वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यजमान दिल्ली आणि आसाम यांच्यात सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर दिल्लीने पहिल्या डावात 7 बाद 271 धावा जमवल्या. ध्रुव शोरेने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले 8 वे शतक झळकवले.
या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. दिल्लीचा कर्णधार यश धूलने 56 चेंडूत 22 तर वैभव रावलने 71 चेंडूत 43 धावा जमवल्या. दिल्लीचा सलामीचा फलंदाज नितीश राणा डावातील पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर ध्रुव शोरेने आपल्या शानदार शतकाच्या जोरावर संघाला बऱयापैकी स्थितीत नेले. अंधूक प्रकाशामुळे पंचांनी खेळ लवकर थांबवला. 81 षटकात दिल्लीने 7 बाद 271 धावा जमवल्या. ध्रुव शोरे 216 चेंडूत 139 धावावर खेळत आहे. आसामतर्फे एम. दत्ताने 50 धावात दोन गडी बाद केले.









