उपराष्ट्रपती धनखर यांच्या गोवा भेटीमुळे उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
प्रतिनिधी/ पणजी
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर हे गुरूवारी 9 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गोवा वैद्यकीय महाविद्यालय इमारतीबाहेरील परिसरात सुरू राहणारे दुकाने व स्टॉल बंद करण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.
गुरूवारी 9 नोव्हेंबर दुपारी 12 ते संध्याकाळी 6 या वेळेत बांबोळी येथील गोमेकॉच्या बाहेरील दुकाने आणि स्टॉल्स बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम बांबोळी येथे 37 व्या राष्ट्रीय खेळांच्या समारोप समारंभाला उपस्थित राहण्यासाठी उपराष्ट्रपती गोव्यात असतील. त्यामुळे आतापासूनच सुरक्षेची खबरदारी घेण्यात येत आहे.









